नियमांचे उल्लघंन करणाऱ्या ८७ जणांवर गुन्हे दाखल

नियमांचे उल्लघंन पंढरपूर -१०- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचार बंदी घोषीत केली आहे. संचारबंदी सुरु असूनही त्यांची अंमलबजावणी न करणाऱ्या पंढरपूर उपविभागात ८७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच वाहतुक कारवाईत १ हजार ४०४ जणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४ लाख ७१ हजाराचा दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच ८०२ वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी दिली. ___ कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून संचार बंदी लागू करण्यात आली आहे. नागरीकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. तरी नागरीक घराबाहेर पडत आहे या नियमांचे उल्लघंन केल्याने मुंबई पोलीस कायदा कलम ६८/६९ अन्वये ३२६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. संचार बंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा सोडून रस्त्यावर विनाकरण वाहने घेवून फिरणाऱ्या १ हजार ४०४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच मॉर्निंग वॉक ला फिरणाऱ्या १११ नागरीकांवर कारवाई करण्यात आली असल्याचेही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कवडे यांनी सांगितले. सचार बदीच्या कालावधीत पंढरपूर उपविभागात अवैधरित्या वाळू चोरीचे १३ गुन्हे दाखल करुन २४ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्या ठिकाणाहून ४४ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे. त्याचबरोबर अवैध दारु विक्री व जुगार खेळणाऱ्या ९८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्याच्याकडून एकूण ४ लाख ४० हजार १५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचेही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कवडे यांनी सांगितले. ___ कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून संचार बंदी लागू करण्यात आली आहे. नागरीकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. तरीही नागरीक घराबाहेर पडत आहेत, काही ठिकाणी नागरीक गर्दी करत असल्याची बाब पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे विनाकारण गर्दी करणऱ्या नागरीकांवर ड्रोन कीराव्दारे लक्ष ठेवण्यात येत आहे. या कॅमेऱ्याव्दारे गर्दीचे ठिकाणे व नाक्यावर विशेष नजर ठेवण्यात येत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कवडे यांनी सांगितले.