आंबेडकर यांची जयंती घरीच राहुनच साजरी करावी

कुरुंदवाड दि. १० - शिरोळ तालुक्यातील सर्व बहुजन बांधवानी महात्मा फुले व भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच राहूनच साजरी करावी व त्यावरील खर्च गरजूच्या मदतीसाठी द्यावा सौ. अर्चना ढाले यांनी व्यक्त केली. महात्मा जोतीराव फुले व १४ एप्रिल रोजी होणारी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सण येत आहे।. दरवर्षी बहजन समाज आंबेडकर या महापुरुषांची जयंती जगभर मोठ्या उत्साहात साजरी करतो. पण या वर्षी तशी वेळ नाही,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या या राष्ट्रासाठी खुप मोठे योगदान दिले आहे. अगोदर राष्ट्र महत्वाचे आहे, आज आपल्या देशावर कोरोनाने थैमान घातले आहे हि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वच भिम बांधव व भगिनीनी यावर्षीची या महापुरुषांची जयंती पुस्तक वाचन प्रतिमा पूजन करून घरी राहुनच साजरी करावी व घरातच संविधान वाचन करावे देशात सुरु असलेल्या लाँक डाउनचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती सौ. अर्चना ढाले यांनी व्यक्त केली, तसेच लॉकडाऊन मूळे गरीबाच्या हाताला काम नाही उपासमार सुरू आहे त्याकरिता जयंतीचा खर्च ह्यांना द्यावा अशी विनंती बांधवाना केली आहे. यावेळी युवा नेते धम्मपाल द्वाले उपस्थित होते