इचलकरंजी दि. १० - करोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आमदार प्रकाश आवाडे यांनी पंचगंगा नदीची पाहणी करुन प्रदुषण संदर्भात माहिती जाणून घेतली. महिन्याभरापासून शहर आणि परिसरातील सर्वच उद्योगधंदे बंद राहिल्याने दैनंदिन होणाऱ्या औद्योगिक प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट होऊन मोठ्या प्रमाणात पाणी स्वच्छ झाल्याचे दिसून आले. ___ सध्या देशभरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत, त्याच अनुषंगाने देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. इचलकरंजी हे वस्त्रोद्यागाचे प्रमुख केंद्र असून शहरातील आणि परिसरातील औद्योगिक वसाहतीतील सर्वच उद्योगधंदे बंद राहिले आहेत. त्याचबरोबर रस्त्यावर वाहन दिसत नसल्यान सर्वच प्रकारच्या प्रदुषणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मागील काही वर्षापासून पंचगंगा नदी प्रदुषणाचा प्रश्न सातत्याने चर्चेत येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पंचगंगा नदीकाठी भेट देऊन पाहणी केली, लॉक डाऊ नमुळे नदीतू न होणारा पाणी उपसा पूर्णत: ठप्प झाला आहे. त्याचबरोबर जनावरे , धुणे, कपडे धुणे यालाही आळा बसला आहे, तसेच उद्योग धं देही बंद असल्यामुळे नदीच्या प्रदुषणात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले . पंचगंगा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छ झाले असल्याचे निदर्शनास आले, यावेळी प्रकाश दत्तवाडे , बाळासाहेब कलागते , एम, के, काबळे आदी उपस्थित होते.
करोनाच्या पार्श्वभूमीवर आ. प्रकाश आवाडे यांचेकडून पंचगंगा नदीची पाहणी